भौगोलीकद्रृष्टया

भौगोलीकद्रृष्टया गावाची माहीती

जिल्हा व तालुक्यापाासुनचे अंतर

जिल्हा अहमदनगर   पासुन कोल्हार चे अंतर 58 किमी।
तालुका राहुरी       पासुन कोल्हार चे अंतर 19 किमी।
जनगननेनुसार लोकसंख्या
स्त्रि पुरूष साक्षरतेचे प्रमाण
पाणी पुरवठयाची सुविधा  नळपाणी पुरवठा योजना
स्त्रोत  नदी तलाव विहीर कुपनलीका

पिण्याच्या पाण्याच्या ऊपलब्धता  व गुणवत्ता 
प्रती मानसी 30 लिटर पाणी ऊपलब्ध असुन ग्रामपंचायतीकडुन दररोज टि।सी।एल चा 1000 लिटर पाण्यामध्ये 5 ग्रॅम वापर केला जातो। ग्रामिण आरोग्य केंद्र कोल्हार खुर्द मध्ये दर महिण्याला पाणी तपासणी केली जाते।

गावात राबविण्यात योजना किंवा प्रकल्प

 • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
  सन 2006।2007 पासुन संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेतला।
  सन 2006।2007 चा जिल्हापरिषद गट पातळीवर प्रथम क्रंमाक मिळाला।
 • संपुर्ण स्वच्छता अभिमान
 • निर्मल ग्राम पुरस्कार
 • स्वजलधारा

स्वजलधारा अंतर्गत 22 लाख रूपये खर्च करून टाकी बाधण्यात आली।टाकीची क्षमता 1 लक्ष 25 हजार लिटर आहे।मेन पाईपलाइन 6 इंच व 3 किमी लांब आहे।

 • गाव कसे प्रवृत्त झाले त्या बददलची माहीती
  गाव हे अहमदनगर मनमाड हायवे व तिर्थक्षेत्र शिर्डी वरून शिंगणापुरला जाणारे भावीक स्वंयभु मळगंगादेवी व भगवतीमातेच्या दर्शनासाठी थांबतात।त्यामुळे गावकरी बंधुनी ग्रामस्वच्छता अभियानातुन गाव स्वच्छ ठेवल्ेा त्यामुळे भाविक आकर्षित झाले व त्यातुन रोजगार निर्मीती झाली।
 • पुर्वीची स्थिती व माहीती
  गावाची एकुन कुंटुब सख्ंया 1439 होती त्यापैकी 5 टक्के कुटंुबाकडेच शौचालय होते।बाकी सर्व उघडयावर शौचास जात असे। त्यामुळे चोहीकडे प्रंचड घाण व दुंर्गधी येत असे।रस्तेच्या कडेला पाणी साचत असे।तेथे डास निर्माण होत असे।

 • लोकांचा प्रतीसाद गावात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यासाठी लोंकाना अभियानाचे महत्व पटवुन देण्यात आले।
 • लोकांचा सहभाग मिळविण्यासाठी केलेली उपाय योजना
  लोंकाना घाणीमुळे होणारे दुष्परिणाम सांगण्यात आले।स्वच्छतेचे महत्व पटवुन देण्यात आले।  गावातील सर्व स्तरावरील नागरीक कर्मचारी महिला तरूण भजनीमंडळ युवक मंडळ बचत गट विद्यार्थी यांना एकत्र घेऊनकाम करण्यात आले।
 • महिलांचा सहभाग  गा्रमसभेत महिलांचा सहभाग
  स्वच्छता ही संपुर्ण महिलासी निगडीत असल्यामुळे महिलांचा सहभाग मोठया प्रमाणात मिळाल्यामुळे गाव स्वच्छ सुंदर झाले।

 • झालेला बदल गाव स्वच्छ व सुंदर हेाऊन रोगराई मुक्त झाले।
 • मिळालेले पुरस्कार  1। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2006।2007 मध्ये जिल्हा परिषद गट पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला।
 • सद्यस्थिती
  गाव स्वच्छ व सुंदर हेाऊन रोगराई मुक्त झाले।
  100 टक्के गाव स्वच्छ
  085 टक्के आजारांचे प्रमाण घडले।
  080 टक्के हागणदारी मुक्त झाले।
  080 टक्के प्लास्टीक व गुटखा बंद गाव

गावात विशिष्ट क्षेत्रात कार्य केले असेल तर माहीती।

 • शेतीेविषयक: श्री ।सुनिल बापुसाहेब पा। शिरसाठ  यांची फुलबाग लागवड
  जुनी पिक पध्दत बदलुन सुधारीत बियाणे वापरात आणले।
 • भाजीपाला लागवड
 • फुलबाग लागवड
 • फळबाग लागवड
 • गांडुळखत
  शेतातील टाकाऊ मालाच्या विल्हेवाटीसाठी गांडुळ खत प्रकल्प
 • शहामृग पालन: श्री। रंगनाथ दगडु पा।गाढे यांनी 80  शहामृग पक्षांचे पालन केले आहे।

 • गोबरगॅस  260 गोबरगॅस कार्यान्वित आहेत।
 • सौर ऊर्जा
  1.सोलर दिवा आणि
  2.ठिकाणी व्ययक्तिक सोलर हिटर आहे।

महिलांनी केलेल्या ऊपक्रमाची माहिती 
महिला बचतगटाची सख्ंया व नाव 
गावात एकुन 06 महिला बचतगट कार्यरत आहे।

 • मळगंगा महिला स्वंय सहाय्यता बचतगट  कोल्हार खुर्द
  सदस्य संख्या  11
  अध्यक्षा सौ।रेणुका विष्णु गायकवाड
  सचिव। सौ। संगीता बापुसाहेब शिरसाठ
 • जिजामाता महिला स्वंय सहाय्यता बचतगट
  सदस्य संख्या 11
 • प्रगती महिला स्वंय सहाय्यता बचतगट
  सदस्य संख्या 11
 • भगवतीमाता महिला स्वंय सहाय्यता बचतगट
  सदस्य संख्या 11
 • प्रवरा महिला स्वंय सहाय्यता बचतगट
  सदस्य संख्या 11
 • ओम नमशिवाय महिला स्वंय सहाय्यता बचतगट
  सदस्य संख्या 11

बचतगताअंतर्गत चालविल्ेाली कामे ऊत्पादने व त्यातुन होणारा फायदा:
बचत गटामाफ‍र्त पापडऊद्योग मेणवत्ती ऊद्योग शिलाई व्यवसाय इ।कामे चालतात। गावातील महिलांना रोजगार ऊपलब्ध झाल्यामुळे गावाच्या विकासात भर पडली।